॥ झाडु संतांचे मार्ग ॥ करु पंढरीचा स्वर्ग ॥
स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), स्वच्छ सर्वेक्षण 2025, व माझी वसुंधरा 6.0 यांच्या वतीने सहर्ष स्वागत
माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी आहे.
- यात्रेकरु, दिंडीकरी, फडकरी, भाविक भक्त इ. यांची राहणेची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे.
- उघड्यावर शौचास बसु नये प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा.
- शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा.
पत्रावळी व द्रोणचा वापर
- जेवणाकरीता थर्माकोल, प्लॉस्टिकच्या पत्रावळी वापरू नये, त्याएवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा, द्रोणचा वापर करावा व प्लॉस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा.
- कचरा व्यवस्थापन आपल्या मठ/संस्था इ. मध्ये निर्माण होणारा कचरा/पत्रावळी द्रोण, शिळे खरकटे अन्न इ.तीन टिपामध्ये ओला, सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटा गाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा. रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकु नये.
- नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये, नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे.
- शिळे अन्न, नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये.
- धोकादायक इमारतीमध्ये राहू नये.
पार्कंग व्यवस्था ठिकाणेभिमा बस स्टँड मोहोळ रोड, ६५ एकर मागील बाजु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडा संकुल, अंबाबाई पटांगण, इसबावी विसावा पार्किंग, वेअर हाऊस पार्किंग, यमाई तुकाई पार्किंग, बिडारी बंगला पार्किंग, गजानन महाराज मठ क्र.१, एलआयसी ऑफीस पार्किंग, सुलभ शौचालय पार्किंग, गाडगेबाबा चौक, भक्त निवास, तुळशी वृंदावन शेजारी, ५२ एकर पार्किंग, वाखरी, खादी ग्रामोद्योग, ६५ दिंडी परिसर वाहन, सखुबाई कन्या प्रशाला पार्किंग इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.
वरील सुचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.
श्री. सचिन इथापे
प्रशासक नगरपरिषद पंढरपूर
श्री. महेश रोकडे
मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा