वाईच्या वनविभागाच्या गलथान कारभारामुळे बिबट्याचा वासोळ्यात धुमाकूळ - बाजीराव नवघणे

बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला - कुत्रा थोडक्यात बचावला 

Leopard attacks dog, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई  (प्रतिनिधी शुभम कोदे) 

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वासोळे  गावात रविवारच्या मध्य रात्रीच्या वेळी अंदाजे दिड वाजण्याच्या सुमारास  गावचे सामाजिक कार्यकर्ते आणी उद्योजक बाजीराव नवघणे यांच्या दारात बिबट्या पोहचला आणी तेथे असणाऱ्या पाळीव कुत्र्यावर झडप घातली अन् कुत्रा जोरात ओरडला त्यावेळी बाजीरावांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने  पळ काढला .पण या हल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे . या घटने मुळे नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .वाई तालुक्याच्या वनविभागाच्या गलथान कारभारा मुळे धोम धरणाचे पश्चिम भागातील शेवटचे गाव म्हणजे वासोळे गाव आहे .या गावाच्या उशालाच सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या डोंगर दऱ्या आहेत त्यात घनदाट जंगल असल्यामुळे .या घनदाट जंगलात गेल्या कित्येक वर्षांपासून रानडुकरांचे   मोठ मोठे कळपांनसह   बिबट्याचा रहावा आहे त्याने आज पर्यंत गाई म्हैशी शेळ्या कुत्री यांचे मुडदे पाडले आहेत.त्याच्या ऩोंदी वनविभागाच्या दप्तरी आढळून येतात .

त्यामुळे येथील शेतकऱ्याचे पशुधन देखील धोक्यात आले  आहे . त्याच बरोबर येथील शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे ‌.असा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवघणे यांनी केला आहे .ते माहिती देताना पुढे म्हणाले कि या बाबतच्या तक्रारी अनेकदा माझ्यासह येथील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे करून रानडुकरानसह बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करुन देखील वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या गंभीर प्रश्नाकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करून माणसांचे मुडदे बिबट्याने पाडावेत व तदनंतरच वनविभाग उपाय योजना करणार का ? असा संतप्त सवाल बाजीराव नवघणे यांनी केला आहे .

वाईच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनसह या गावांसाठी आणी परिसरासाठी नेमलेले कर्मचारी नेमके काय काम करतात याची चौकशी सातारा येथील वरिष्ठ अधिकारी वर्गाने तातडीने करुन बेजबाबदार अधिकारी आणी कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशीही मागणी बाजीराव नवघणे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे .

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !