तहसीलदारांची जिल्हाधिकारी भेट दिशाभूल करणारी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
लाँग मार्चच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी कात्रजचा बोगदा दणाणून सोडला. अंगावरील कपडे काढत अर्धनग्न आंदोलन करत सातारा जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सुद्धा प्रशासनाकडून आंदोलनाची कसलीच दखल घेण्यात आली नाही. महसूल प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिला नाही. वाई तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी भेटीचं पत्र देऊन ४ दिवस झाले. आज शासकीय कामकाजाचा दिवस असताना सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून या आंदोलनाची कसलीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वाई तहसीलदार यांचा जिल्हाधिकारी भेटीचे पत्र हे निव्वळ दिशाभूल करणारे होते यात आता शंका राहिली नाही. काल एका आंदोलनकर्त्या महिलेला हृदयविकाराचा झटका आला मात्र सातारा जिल्हा प्रशासनाच्या हृदयाला अद्यापही पाजर फुटला नाही. त्यामुळे पुढे हे आंदोलन तीव्र स्वरूप घेताना दिसत आहे.
उद्या हा लाँग मार्च पुणे शहरातून विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे. त्यांना निवेदन देऊन हा लाँग मार्च लगेच मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा