अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त

डॉ.सुजित शेलार यांच्याकडून विद्यार्थ्यांना २००० वृक्ष आणि २००० वह्यांचे वाटप

Birthday celebration, DCM Ajit Pawar, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर  (प्रतिनिधी फैजल पठाण)  

मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिम्मित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्चं माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना 2000 वृक्ष व गरजूंना 2000 वाह्यांचे वाटपाचा कार्यक्रम डॉ. सुजित शेलार यांच्या माध्यमातून संपन्न झाला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर चे ता. अध्यक्ष  रविबापू काळे  व जिल्हा उपाध्यक्ष  महेशबापू ढमढेरे तसेच महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस  तृप्तीताई सरोदे उपस्थित होत्या. 

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य  काकासाहेब खळदकर यांनी विद्यालयाची प्रगती व भौतिक सुविधा उभारणीतील लोकसहभागाचा उल्लेख करत उर्वरित इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी मा. आ. माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून सहकार्य मिळावे  व सी एस  आर फंडातून इमारत पूर्णत्वास न्यावी अशी मागणी केली. 

या प्रसंगी बोलताना  महेशबापू ढमढेरे यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना सर्वांटनी या कामी सहकार्याची भूमिका घेत काम पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले व शाळेच्या विकासकामासाठी रोख रक्कम 5000 रुपयांची देणगी दिली. तर अध्यक्ष स्थानावरून  बोलताना  रविबापू काळे यांनी मा. आ.  माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून सी एस आर फण्ड उपलब्ध करून देऊ असे सांगितले. यावेळी शिरूर  तालुक्यात  40,000 हजार वृक्ष लागवाडीचा संकल्प करणारे  उमेश रणदिवे यांनी वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्षरोपणाचे महत्व सांगताना विविध वृक्षाचे गुणधर्म सांगत विद्यार्थ्यांना वृक्षालागवाडीचे व संगोपणाचे महत्व सांगितले.  

अनेक मान्यवारांनी आपलें मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुजित शेलार यांनी केले तर स्वागत प्राचार्य  दिवे सरांनी केले तर सूत्रसंचालन व आभार  चंद्रशेखर काकडे सर यांनी  व्यक्त केले. या कार्यक्रमास वडगाव रासाई चे सरपंच  सचिन दादा शेलार, कुंडलिकराव शितोळे, राहूल रणदिवे, दादासाहेब ढवळे, बबन निवृत्ती ढवळे,  वीरेंद्र शेलार, सोमनाथ शेलार, डॉ अनिल शेलार,  भैय्या देशमुख,  तात्यासाहेब शेलार , विलासतात्या शेलार, मीनानाथ ढवळे, धनंजय ढवळे, नागरगावचे शरद साठे , सुधीर फराटे, काकासाहेब शेलार,   गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  नंदकुमार मगर सर  ,गुंड सर, वळवी सर, मेंडके सर, गायकवाड सर, झिंगाडे सर व  कांडगे सर यांच्यासह सर्व गुरुदेव कार्यकर्ते व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थांनी परिश्रम घेतले.

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !