यश नर्सिंग होम शिक्रापूरचे संस्थापक डॉक्टर चंद्रकांत केदारी यांच्या मार्फत वह्या वाटप
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर प्रतिनिधी फैजल पठाण
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी यश नर्सिंग होम शिक्रापूरचे संस्थापक डॉक्टर चंद्रकांत केदारी यांच्या मार्फत प्रशालेतील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना वही वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे , अमरज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र केदारी, धानोरे गावचे माजी सरपंच बाबुरावजी भोसुरे, शिरूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित शेलार ,युवक कार्यकर्ते सोमनाथ ढमढेरे संस्थेचे हितचिंतक सचिन पंडित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी असलेले बाबुरावजी भोसूरे यांनी प्रशालेतील माजी शिक्षकांवर त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करत असताना सुंदर अशी कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली.
प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे ,पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे उपशिक्षक चंद्रशेखर सातपुते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अविनाश कुंभार यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे ,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा