गुजर प्रशालेत घुमला टाळ मृदंग आणि हरिनामाचा गजर
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी शालेय दिंडी सोहळा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकरी वेशभूषेत, टाळ मृदंग, तुळशी वृंदावन, विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमा व मूर्ती घेऊन प्रशालेत उत्साहात आले. काही विद्यार्थ्यांनी संत महात्म्यांचे पेहराव घालून दिंडी सोहळ्याला वेगळाच उत्साह प्राप्त करून दिला.
प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे ,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे व पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या पेहरावत आलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थी संग्राम उकले याच्या मार्फत प्रशालेत अश्व रिंगण संपन्न झाल्यानंतर प्रशालेच्या दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.
तळेगावातील विविध पेठांमधून दिंडीचे प्रस्थान होत बाजार मैदान येथे प्रशालेतील दिंडी सोहळ्याने विसावा घेतला. या ठिकाणी ग्राम स्वच्छतेवर आधारित पथनाट्य यांचे सादरीकरण प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्फत करण्यात आले त्याचप्रमाणे प्रशालेच्या विद्यार्थिनींनी वारकरी नृत्यही तेथे सादर केले या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थिनींनी ग्रामस्थांना व्यसनमुक्ती, वृक्षारोपणाचे महत्त्व व परिसर स्वच्छता किती महत्त्वाची आहे याचा संदेश दिला.
बाजार मैदान येथे झालेल्या कार्यक्रमातशिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे, श्रीपती भुजबळ, पत्रकार मयूर भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र सातपुते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थिनींनी केलेल्या पथनाट्याचे व सादरीकरणाचे कौतुक सर्व ग्रामस्थांनी केले. यानंतर प्रशालेची दिंडीने शिक्षण प्रसारक मंडळ याचे जेष्ठ संचालक विजय ढमढेरे यांच्या निवासस्थानी विसावा घेतला. तिथे पालखीचे पूजन करण्यात आले व शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सुनंदा ढमढेरे व मालन ढमढेरे यांनी उत्कृष्ट अभंगाचे गायन करून विद्यार्थ्यांना अभंग गायनाची प्रेरणा दिली.
त्यानंतर प्रशालेचा दिंडीचे प्रस्थान ग्राम पंचायत तळेगाव ढमढेरे या ठिकाणी झाले तिथे सामाजिक कार्यकर्ते व आरंभ प्रॉपर्टीज चे चेअरमन नवनाथ भुजबळ व तळेगावचे माजी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांच्या हस्ते प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले.
या सर्व दिंडी सोहळ्यात प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या संपूर्ण दिंडी सोहळ्याचे शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर मानद सचिव अरविंद ढमढेरे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी कौतुक केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा