भेटवस्तू स्वरूपाने दिला मदतीचा हात
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
घरात पाणी शिरल्याने मोठ्या नुकसानाला सामोरे गेलेल्या निघोज येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे निघोज येथील सदस्य पत्रकार संपतराव वैरागर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने किराणा माल व आवश्यक वस्तूंचे वितरण करून माणुसकीची साथ देण्यात आली.
दि. १९ रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांनी थेट वैरागर यांच्या निघोज येथील घरकुलात असलेल्या घराला भेट देत मदतीचा हात पुढे केला. काही दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे त्यांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात साहित्याचे नुकसान झाले होते. ही माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक व मार्गदर्शक संजयराव भोकरे यांनी तत्काळ पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांना याबाबत माहिती दिली.
काल पत्रकार वैरागर यांना प्रत्यक्ष भेटून डॉ. विश्वासराव आरोटे व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ब्रँड ॲम्बेसिडर संजय फुलसुंदर यांनी किराणा माल व इतर जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या. यावेळी पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये , यासाठी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने आवश्यक उपाययोजना केली जाणार असल्याचे आश्वासनही आरोटे यांनी दिले.
चांद्यापासून ते बांद्यापर्यंतसंघाचे कार्य
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा देशातील सर्वांत मोठा पत्रकारांचा संघ असून थेट चांद्यापासून ते बांदयापर्यंत कोणत्याही पत्रकाराच्या घरी सुखद वा दुःखद घटना घडल्यास प्रदेश सचिव डॉ . विश्वासराव आरोटे आपल्या सहकाऱ्यां सह त्या संबंधीत पत्रकाराच्या घरी जाऊन त्या कुटूंबीयांचे सांत्वन करत त्या जीवनाश्यक वस्तू वा आर्थिक मदत करतात . पत्रकाराच्या दुःखात सहभागी होऊन दिलासा देण्याचे हे उदाहरण समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा हा उपक्रम खर्या अर्थाने 'पत्रकार हित ' जोपासणारा आहे , असे मत प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा