पोलीस पथकाने आरोपी व गुन्हयातील वाहन घेतले ताब्यात
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
दिनांक १८ जून २०२५ रोजी फिर्यादी सिध्दिकी रियाज बागवान रा. रविवार पेठ, फलटण यांनी लोणंद पोलीस ठाण्यात येवुन तक्रार दिली की, त्यांचे चुलते असिफ जहांगिर बागवान वय ४६ वर्षे रा. उमाजी नाईक चौक, फलटण यांना दिनांक १७ जून २०२५ रोजी रात्री ११.४५ वा. शिरवळ चौक, लोणंद या ठिकाणी एका अज्ञात वाहनावरील चालकाने वाहन हयगयीने, अविचाराने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन जोरात वाहन चालवुन धडक देवुन अपघातात त्यांच्या डोक्याला व उजव्या पायास गंभीर व किरकोळ जखमा होवुन त्यांच्या मृत्यूला कारणीभुत झाला व तेथुन पळुन गेला अशी फिर्याद दिल्याने लोणंद पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांर्भीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधिक्षक सातारा तुषार दोषी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सातारा वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुशिल भोसले सहा. पोलीस निरिक्षक व त्यांच्या पथकाने सदर गुन्हयातील अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यास सुरवात केली असता पोलीसांनी गोपनीय माहीती काढुन सदर अपघात करुन पळुन गेलेले वाहन हे मारुती सुझुकी कंपनीचे ईको गाडी क्र. मारुती सुझुकी ईको क्र MH 11 CW 9892 आहे व त्यावरील चालक हा यशवंत कृष्णा माने वय २७ वर्षे रा. मातंगवस्ती, लोणंद ता. खंडाळा जि. सातारा हा असल्याची खात्री केली व तात्काळ पोलीस पथकाने यातील आरोपी व गुन्हयातील वाहन ताब्यात घेतले असुन यातील आरोपीनें गुन्हा केलेचे कबुल केले आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, पोहवा संतोष नाळे, पो.ना बापुराव मदने, पो.कॉ. अंकुश कोळेकर, गोविदं आंधळे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन पोलीस हवालदार संतोष नाळे हे पुढील तपास करीत आहेत. मा. पोलीस अधिक्षक सातारा यांनी विषेश अभिनंदन केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा