ओझर्डे गावावर पसरली शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ओझर्डे येथील ज्येष्ठ नागरिक यशोदा निवृत्ती फरांदे यांचे 10 जून रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अस्वस्थ होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय 94 वर्षे होते. यशोदा आजी या गावातील जुन्या जाणत्या लोकांपैकी एक होत्या त्यामुळे गावात त्यांचा सर्वांशी परिचय होता. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा