विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा होणार गौरव
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात समाज हिताचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शिवशाही महारत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये शिवशाही महारत्न, समाजसेवा, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, सांस्कृतिक, संशोधन, उद्योग, सहकार, अध्यात्म, पर्यावरण, कृषी, कला, क्रीडा , संरक्षण, वीरमाता, आदर्श माता, पत्रकारिता, प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, विधी सेवा, या क्षेत्रात काम केलेल्या आणि भरीव योगदान दिलेल्या व्यक्ती किंवा संस्थांचा समावेश असेल. या क्षेत्रात काम केलेल्या पात्र व्यक्ती आणि संस्थांनी आपले प्रस्ताव ३० जून २०२५ किंवा त्यापूर्वी पोहोचतील असे पाठवावे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्ती आणि संस्थांचा बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुस्तकांचा संच, आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृपया पात्र व्यक्तींनी आणि संस्थांनी आपले प्रस्ताव त्वरित पाठवावे असे आवाहन शिवशाही न्यूज नेटवर्क चे संपादक सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रस्ताव पाठवण्यासाठी ईमेलshivshahinewsnetwork@gmail.comअधिक माहितीसाठी9096251211या नंबर वर संपर्क करावाwww.shivshahinews.comwww.youtube.com/@shivshahinewswww.facebook/@shivshahinewsnetwork
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा