दहावीच्या मार्च २०२५च्या बोर्ड परीक्षेत 33 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त मार्क
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द. ह. कवठेकर प्रशालेमध्ये मार्च 2025 दहावी बोर्ड परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. या वेळी अगदी पारंपारिक पद्धतीने हलगी ताशाच्या ठेक्यावर ,टाळ्यांच्या गजरात ,फुलांच्या वर्षावात या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. नाना मालक कवठेकर, संस्था सदस्य, गुरुवर्य एस. पी. कुलकर्णी सर ,डॉक्टर मिलिंद जोशी ,श्रीयुत संजय कुलकर्णी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला.
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एम. कुलकर्णी सर यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये प्रशालेच्या यशाची चढती कमान पालक व विद्यार्थ्यांसमोर मांडली. प्रशालेने मिळवलेले प्रत्येक यश हे विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांनी प्राप्त केलेले सुयशच आहे. दहावीच्या मार्च २०२५च्या बोर्ड परीक्षेमध्ये पंढरपूर तालुक्यात प्रथम आलेला द. ह.कवठेकर प्रशालेचा विद्यार्थी चिरंजीव विनीत शिंदे व 33 इतर 90% पेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये प्रशालेत दुसरी आलेली विद्यार्थिनी कुमारी सानिका धर्माधिकारी हिने स्वतःच्या यशामध्ये प्रशालेचा व पालकांचा खूप मोठा सहभाग असल्याचे मत व्यक्त केले .जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न थांबवायचे नाही ही महत्त्वाची शिकवण ही आपल्या इतर विद्यार्थ्यांनाही दिली. पालकांमधून मग व्यक्त करताना आदरणीय बुवा सर म्हणाले की द. ह. कवठेकर प्रशाला ही गुणवंतांची खाण असून येथे अनेक गुणवान विद्यार्थी व शिक्षक आहेत. संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री. एस. पी. कुलकर्णी यांनी मुलांना मार्गदर्शन करताना म्हटले की मुलांनो यश मिळाले ते टिकवून ठेवण्यासाठी खूप खूप प्रयत्न करा. तुम्हाला मिळालेले यश हे तुम्ही केलेले कष्ट दाखवते आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एम. कुलकर्णी सरानी केले.आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक श्री. समीर दिवाण सरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमा साठी संस्थेचे अध्यक्ष श्री. नानामालक कवठेकर, जेष्ठ सदस्य गुरुवर्य एस. पी. कुलकर्णी सर, श्री. संजय कुलकर्णी सर, डॉ. मिलिंद जोशी, प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. मुंढे सर, जेष्ठ पर्यवेक्षक श्री आर. एस. कुलकर्णी सर हे उपस्थित होते. कार्यक्रमास पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री सुरेश वगरे सर,सहसचिवा वैशाली शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. दिपाली सतपाल,उपाध्यक्ष श्री महेश तेंडुलकर उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा