शासनाने मराठी भाषेचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही

जनहित विधी जिल्हाध्यक्ष स्वप्निल माळवे यांचा इशारा

Marathi language, Raj Thackeray, MNS, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जनहित विधी  किशोर भाऊ शिंदे व अरुण लंबगोळ(उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९/०६/२०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने हिंदी भाषा सक्ती विरोधात शिरूर तालुका गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर तसेच विस्तार अधिकारी शिंदे यांना मनसे जनहित विधी जिल्हाध्यक्ष स्वप्निल माळवे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

 महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषा शैक्षणिक धोरण म्हणून लादली असून, मराठी भाषेचा दर्जा कमी करण्याचे काम शासनाकडून चालू आहे. मराठी भाषेला पर्यायी भाषा म्हणून हिंदी भाषेची सक्ती नको, त्यामुळे ती तात्काळ काढून टाकावी. तसेच सर्व शाळांना तात्काळ हा विषय अवगत करावा ,अन्यथा या विषयास अनुसरून मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल. या कामे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी अशा अशायाचं निवेदन आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे देण्यात आले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !