महाबळेश्वर परिसरात सध्या पावसाची जोरदार हजेरी - दरड कोसळल्याने महाबळेश्वर तापोळा वाहतूक ठप्प

पर्यायी मार्गांने वळवली वाहतूक रात्रीच्या वेळी प्रवास न करण्याचे आवाहन

Heavy rain and landslides, mahabaleshwar, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाबळेश्वर परिसरात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून सतत सुरू असणाऱ्या जोरदार पावसाने तालुक्याला अक्षरशः  झोडपून काढले आहे. महाबळेश्वर ते तापोळ्याला जोडणारा मुख्य रस्ता खचून वाहून गेल्याने महाबळेश्वर तापोळा वाहतूक ठप्प झाली आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावर आलेली दरड जेसीबीच्या मदतीने साफ करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. 

परंतु महाबळेश्वर पासून १० किलोमीटरवर असणाऱ्या चिखली शेड नजिकच्या घाटात भूस्खलन झाल्याने पहिल्याच पावसामध्ये रस्ता वाहून गेला. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षा पासून सुरू असलेले महाबळेश्वर ते तापोळा रोडचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले होते. पावसाचा जोर पाहता या भागात मोठया प्रमाणात भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झाली असून परस्थिती चिंताजनक झाल्याचे निदर्शनास येत आहे. 

महाबळेश्वर परिसरात गेल्या काही दिवसां पासून पाऊस सुरू असून आतापर्यंत एकूण २५ इंच इतका पाऊस पडला आहे. या पावसामुळे चिखली ते झोळ खिंडी  या घाटात रस्त्या लागत असणाऱ्या डोंगराळ भागात विविध ठिकाणी पाण्याचे मोठे मोठे प्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मांघर मार्गे  झोळ खिंड इतर पर्यायी मार्गांने वळवली आहे. तसेच रात्रीच्या वेळी या भागातून प्रवास करु नये असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय देशपांडे, पोलिस निरीक्षक बिपीन सांडभोर, पोलीस हवालदार जे व्ही कांबळे व  सय्यद हे स्वतः घटना स्थळी उपस्थित राहुन परस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !