एकूण ७१ विद्यार्थ्यांपैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण
शिवशाही वृत्तसेवा, अहिल्यानगर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शेकडा ८८ . ७३ टक्के लागला असून शाळेची विद्यार्थींनी आश्लेषा विवेक गहाणडुले हीने शेकडा ९६ . ८o टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. १० वी च्या या परीक्षेत एकूण ७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले , त्या पैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत ३८ विद्यार्थी उत्तीर्ण, द्वितीय श्रेणीत १९ विद्यार्थी उत्तीर्ण, तृतीय श्रेणीत उत्तीर्ण ६ विद्यार्थ्यां चा समावेश आहे.
विद्यालयातील प्रथम ५ विद्यार्थ्यां मध्ये कु.आश्लेषा विवेक गहाणडुले शेकडा ९६.८० टक्के , पवार मयूर शंकर शेकडा ९६ . २० टक्के , गहाणडुले अद्वैत विवेक शेकडा ९५ . ८० टक्के , एकशिंगे स्वराज बाळासाहेब शेकडा ९४ . ६० टक्के 9, गोरे अनुज जालिंदर शेकडा ९३ . ४० टक्के गुण मिळवत विद्यालयाचे नाव उज्जवल केले आहे. यावर्षीचा हा सर्वोच्च निकाल असून हे यश म्हणजे विद्यार्थ्यांची चिकाटी, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा विश्वास व मोलाचे सहकार्य याचे फळ आहे , अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे, विद्यालयाचे आधारस्तंभ व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, अभिषेक कळमकर, उत्तर विभागीय अधिकारी तथा मॅनेजिंग कौन्सिल सदस्य नवनाथ बोडखे, ऑडिटर प्राचार्य विश्वासराव काळे, माजी प्राचार्य कैलासराव मोहिते ,अंबादास गरुडकर, शामराव व्यवहारे ,विष्णुपंत म्हस्के, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा आजीव सदस्य शिवाजीराव लंके, संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक, विद्यार्थी, हितचिंतक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक महादेव भद्रे ,प्रभाकर थोरात, सुनिता लांडगे, अमित धामणे, मंगेश कारखिले यांचे अभिनंदन व कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यावर्षी विद्यार्थ्यांची गुणात्मक पातळी वाढली असल्याने परिसरातून विद्यार्थी ,पालक, ग्रामस्थ, हितचिंतक यांच्याकडून आनंद व्यक्त होत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा