अनुष्का गुरव प्रथम, जान्हवी ईटगी व्दितीय, तर गौरी चव्हाण तृतीय
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ओझर्डे (ता. वाई) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पतित पावन विद्या मंदिराचा इयत्ता १० विचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात ८९ टक्के मार्क मिळवुन कु . अनुष्का गणेश गुरव हिने प्रथम क्रमांक पटकावला तर ८७ . ६० टक्के गुण मिळवून कु.जान्हवी उमेश ईटगी हिने द्वितीय क्रमांक पटकावला आणी ८४.६० टक्के गुण मिळवून गौरी जगदीश चव्हाण हिने तृतीय क्रमांक पटकावला . २०२५ च्या या निकालात पतित पावन विद्या मंदिरात सलग तिन्ही मानाचे पहिले क्रमांक पटकावुन मुलींनी आपले नाव कोरुन ग्रामस्थांनसह मुख्याध्यापक आणी सर्व शिक्षकांना आश्चर्याचा धक्का देत हमभी कुच कम नही हे ब्रिद वाक्य सिध्द करुन मुलींनी नवा इतिहास घडवल्याने ओझर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्यानसह गावातील विकास सेवा सोसायटींचे चेअरमन संचालक व पतसंस्थांचे चेअरमन संचालक यांनी मानाचे पहिले ३ क्रमांक पटकावणाऱ्या यशस्वी तीनही मुलींचे कौतुक करुन ज्या मुली व मुले उत्तीर्ण झाले आहेत यांच्यासह मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांचे गावातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनसह तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदन करुन कौतुकांचा वर्षाव केला आहे .
पतितपावन विद्या मंदिरात इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी ऐकून ३४ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी ३२ विद्यार्थी चांगले गुण मिळवुन पास होऊन यशस्वीत्याच्या उंबरठ्यावर उभे राहीले. त्यात डिस्टिंगशन ९ प्रथम श्रेणीत ४ द्वितीय श्रेणीत १७ पास क्लास मध्ये २ आणी दुर्दैवाने २ विद्यार्थी अतीशय कमी मार्काने नापास झाले आहेत.
पतितपावन विद्या मंदिराची १० वी बोर्डाच्या १०० टक्के गौरवशाली निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत सदैव तत्पर असणारे शिक्षण तपस्वी स्वर्गीय एनजी गायकवाड यांचे चिरंजीव आमच्या हायस्कूलचे सेनापती व मुख्याध्यापक गिरीष एन .जी . गायकवाड सौ.पी.पी. बेलोशे. सौ.डि.ए.भगत . एम .ए .मुकादम .एस .बी .आत्तार .कु .एन .ए . सोनावणे .आर .डी .राठोड .एस .बी . फरांदे . सचिन माने . सागर पुजारी . अशी सर्व टिम जादा तास घेवुन माझ्या विषयांचा विद्यार्थी हा मेरीट मध्ये आलाच पाहिजे हि जिंद आणी चिकाटी उराशी बाळगून इतर शिक्षकांन बरोबर स्पर्धा करत एकाग्र होऊन विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य करून ओझर्डे ग्रामस्थांच्या ह्रदयात कसलीही अपेक्षा न बाळगता निकालांचा आनंदाचा बगीचा फुलवतात अशा स्वर्गीय बापुजींच्या सर्व शिक्षकांना ओझर्डे ग्रामस्थांचा मानाचा मुजरा .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा