दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या सणसवाडी येथील भूमीपुञ व कॉंग्रेस पक्षाचे शिरूर तालुकाध्यक्ष तसेच तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष वैभव (तात्या) यादव यांना महाराष्ट्र क्राईम न्युजच्या वर्धापन दिन सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय महात्मा गांधी पुरस्काराने गौरव करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी भूमाता बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई, महाराष्ट्र क्राईम न्युजचे संपादक एकनाथ अडसुळ, सणसवाडीचे माजी सरपंच दत्ताभाऊ हरगुडे, मा.चेअरमन गोरख दरेकर, नामदेव आबा दरेकर, संजय ढमढेरे, कांतिलाल गवारे, दिलिप शेलार आदि मान्यवर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येंने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते वैभव (तात्या) यादव यांनी सणसवाडी गावात व परिसरात सामाजिक क्षेञात उल्लेखनीय असे कार्य केले आहे.सर्वसामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने नेहमी मदतीचा हात देऊन अनमोल कार्य केले आहे.याच उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय महात्मा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा