आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
शनिवार दि. १७ मे २०२५ पारनेर आगारातील बसची कमतरता लक्षात घेवून आमदार काशिनाथ दाते यांनी पारनेर आगारासाठी पारनेर तालुक्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पारनेर आगाराकरिता २५ नवीन बसेसची मागणी परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांचे कडे केली होती. सदर बसेस टप्याटप्याने देण्यात येतील असे आश्वासन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी आमदार दाते यांना दिले होते. शासनाकडे पाठपुरावा केल्याने पाच नवीन बस पारनेर आगाराला उपलब्ध झाल्या असून उद्या रविवार, दि. १८ मे २०२५ रोजी सकाळी साडे आठ वाजता या बसचे आमदार दाते सर, महायुतीचे पदाधिकारी व आगाराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुजन व लोकार्पण करण्यात आले आहे.
पारनेर आगारातून राज्यात लांब पल्ल्याची बस सेवा असून बसची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम प्रवाशी सेवेवर होत होता. प्रवाशांच्या अनेक तक्रारी आमदार दाते यांच्याकडे येत होत्या त्याची दखल घेऊन तसेच प्रवाशांना अधिक चांगली प्रवाशी सेवा पुरविण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी प्रवाशी संख्या अधिक असून बस संख्या कमी असल्याने किमान २५ बस मिळाव्यात अशी मागणी आमदार दाते यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेत आमदार दाते यांनी शासनाकडे २५ बसची मागणी करुन पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पाच नवीन बस पारनेर आगाराला प्राप्त झाल्या आहेत. या बसचा लोकार्पण सोहळा आज सकाळी साडे आठ वाजता आमदार दाते यांच्या हस्ते व महायुती पदाधिकारी व आगाराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
आणखी ५ बस लवकरच मिळणार
मागणी असलेल्या २५ बस पैकी आज पाच बस उपलब्ध झाल्या असून या टप्प्यातील ५ बस लवकरच आगाराला प्राप्त होणार असून उर्वरित १५ बस मिळणेसाठी पाठपुरावा करणार. पारनेर व सुपा आगाराच्या विस्तारीकरणासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे, त्यालाही लवकरच यश मिळेल.
- आ. काशिनाथ दाते
(विधानसभा सदस्य)
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा