सुपा पोलीसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
भिम आर्मी पारनेर तालुका अध्यक्ष संजय सोनवणे यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी सूपा पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत असे म्हटले आहे की पारनेर तालुका अध्यक्ष संजय सोनवणे हे आपल्या घरून (वाडेगव्हाण) येथून काही कामानिमित्त म्हसने फाटा येथे आपल्या गाडीवर येत असताना जातेगाव घाटामध्ये दोघा अज्ञात व्यक्तींनी तोंडाला मास्क लावून लाल रंगाची स्विफ्ट गाडी आडवी लावली व म्हणाले की तू जास्त माजला काय आमच्यावर खोटे ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल करतो का आता तुला सोडतो परत तू दिसला की तुझ्या अंगावर गाडी घालून मारून टाकतो असे म्हणत तेथून निघून गेले व संजय सोनवणे यांनी तत्काळ सूपा पोलीस स्टेशन येथे धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कुटे हे करत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा