मडोळप्पा सुतार यांना देवाज्ञा
![]() |
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील रहिवासी मडोळप्पा सुतार यांचे आज दिनांक नऊ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून आपल्या मुलांना शिक्षण दिले होते. त्यांचे चिरंजीव नागनाथ सुतार हे पत्रकार असून एचपीएन न्यूज चे संपादक आहेत. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मडोळप्पा सुतार यांच्या निधनामुळे चपळगाव, अक्कलकोट, आणि पंढरपूर परिसरात शोककळा पसरली आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा