दोन लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा दहा किलो हस्तगत
शिवशाही वृत्तसेवा, सातारा प्रतिनिधी शुभम कोदे
सातारा मध्ये एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याने विक्रीसाठी आणलेला दोन लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा दहा किलो गांजा हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी अंमली पदार्थ लागवड, वाहतूक, विक्री करणारे इसमांचे विरुध्द कारवाया करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांची २ पथके तयार करुन त्यांना सातारा जिल्हयातील अंमली पदार्थ लागवड, वाहतूक, विक्री करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
दि.१४ मे रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय खबऱ्या मार्फत माहिती प्राप्त झाली की, सातारा शहरामध्ये अतुल धनाजी भगत वय २७, हा इसम त्याच्या अॅक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच.११ डी.सी.८२७८ वरुन गांजा घेवून जाणार आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांना त्या इसमास ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
प्राप्त माहितीच्या अनुशंगाने नमुद तपास पथकाने सातारा शहरात सापळा लावून मिळालेल्या माहितीमधील इसमास ७०,०००/- रुपये किमतीच्या अॅक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच.११ डी.सी.८२७८ सह ताब्यात घेवून त्याचे कब्जातून २,६५,५००/- रुपये किमतीचा गांजा (अंमली पदार्थ) जप्त करुन त्याचे विरुध्द सातारा शहर पोलीस ठाणे गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ विकल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक समाधान बिले सातारा शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने माहे नोव्हेंबर २०२२ पासून गांजा, गांजाची झाडे व अफूची झाडे असे एकूण ४४ कारवाई करुन २,३९,३३,१७०/- रुपये (दोन कोटी, एकोनचाळीस लाख, तेहत्तिस हजार, एकशे सत्तर रुपये) किमतीचा १०६७.१२९ किलो ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा, गांजा झाडे व अफ झाडे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे
पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, अमित माने, अमित सपकाळ, स्वप्निल कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रविराज वर्णेकर, पृथ्वी जाधव, सचिन ससाणे, विक्रम पिसाळ, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, विजय निकम, फॉरेन्सिक विभागाचे मोहन नाचण, अमोल निकम तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विक्रम माने, सुहास कदम यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा