महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शाखा मेळाव्याच्या पुर्वसंध्येला कविसंमेलन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूरच्या वतीने राज्यस्तरीय शाखा मेळावा आयोजित केला आहे त्याच्या पूर्वसंध्येला बहारदार कवी संमेलन पार पडले. स्थानिक निमंत्रित आणि राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी आपल्या एका चढ एक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूरचे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन पार पडले, त्यावेळी विभागीय कार्यवाह कल्याण शिंदे, ज्योतीराम धायगुडे, आणि निमंत्रित कवयित्री मंचावर उपस्थित होत्या.
या कविसंमेलनात महादेव जेधे, अशा पाटील, वीणा व्होरा, सुनील अडगळे, नम्रता पवार, गजानन गायकवाड, मुरलेंद्र शेटे, प्रज्ञा ठाकरे, तेजस्विनी ठाकरे, प्राजक्ता दिवेकर, सुनील जवंजाळ, शिवाजी बंडगर, ज्ञानेश डोंगरे, रोहिणी सोले, सुनील कोरे, रश्मी कौलवार, प्रिया कौलवार, रवी सोनार, सचिन कुलकर्णी,
रामलिंग हगवणे, दत्तात्रय तरळगट्टी, संभाजी अडगळे, लक्ष्मण गोडसे, प्रकाश डबीर, दयानंद डोंगरे, दादासाहेब खरात, इत्यादी कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. त्याला उपस्थित रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व कवींचा मानाचे उपरणे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन अंकुश गाजरे यांनी केले तर मंदार केसकर यांनी आभार मानले.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा