महाराष्ट्रातील तीन पर्यटकांचा समावेश असल्याचा अंदाज
शिवशाही वृत्तसेवा, जम्मू काश्मीर
जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून काळजाचा थरकापुरवणारी ही घटना आहे. जम्मू-काश्मीरच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी गेलेल्या निरपराध पर्यटकांवर पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये 26 पर्यटक ठार झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून 16 जणांनी जीव गमावल्याची पुष्टी करण्यात आले आहे.
सुमारे 2000 पर्यटकांचा ग्रुप येथे निसर्गाचा आनंद घेत होता दरम्यान पोलिसांच्या गणवेशात दोन ते चार दहशतवादी तिथे आले त्यानंतर त्यांनी पर्यटकांना नाव विचारले तसेच कलमा पडायला सांगितले. ते मुस्लिम नसल्याची खात्री पडतात अंदाधुंद गोळीवर सुरू केला विशेषता पुरुषांना लक्ष करण्यात आले त्यावेळी महिला पर्यटक मध्ये त्यासाठी याचना करताना दिसून आल्या. त्यांचा आक्रोश गगनाला भिडला होता काही स्थानिक लोकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र तोपर्यंत दहशतवाद्यांनी आपले काम केले होते आणि ते जंगलात पळून गेले. मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील तीन पर्यटक असल्याचे माहिती समोर आली असून राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा