डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर येथील महावितरण कार्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव व सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शारदा ज्ञानेश्वर मैड राहणार इंदिरानगर यांना आजच्या दिवशी वीज जोड करून देण्यात आला. आजच्या या दिवसाच्या औचित्य साधून सर्व कर्मचारी यांनी त्यांचे कोटेशन चे पैसे भरून एक चांगला उपक्रम व चांगला संदेश महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, सहाय्यक अभियंता वैभव बारवकर, महावितरणचे कर्मचारी सुमित अहिरे, राजेंद्र उरमुरे, दादा महाजन, आप्पा लोंढे, अशोक गुळादे ,परवेज खान, फिरोज खान इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा