लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याचे नागरिकांना आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी स्वस्त धान्य देखील देण्याची योजना चालू केलेली आहे त्याचबरोबर राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई केवायसी करणे देखील बंधनकारक केले असून यासाठी मुदत वेळोवेळी वाढवून दिलेली आहे मात्र आता ज्या कार्डधारकांनी ई केवायसी केलेली नाही अशांना मार्चनंतर रेशन मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी ई केवायसी करून घेण्याचे आवाहन वाई पुरवठा विभागाचे पुरवठा अधिकारी मिर्झा यांनी केले आहे.
सार्वजनिक वितरण विभागाच्या वतीने गोरगरिबांना स्वस्त धान्याचा लाभ दिला जातो मात्र शासकीय कर्मचारी स्वस्त धान्याचा लाभ देत असेल आणि ते निदर्शनास आले तर त्याच्यावर फायदेशीर कारवाई केली जात आहे दरम्यान वाई तालुक्यातील पंतप्रधान योजना व प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी १ लाख १६ हजार ९७६ तसेच केवायसी झालेले ९१ हजार ६८०,शिल्लक २५२९६ इतके राहिले आहेत. पुरवठा विभाग वाईचा केवायसीत जिल्हात दुसरा क्रमांक आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा