१ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपये रकमेचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
शिरवळ ता. खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टार सिटी ह्या अपार्टमेंटमधील एका गळ्यामध्ये १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपये रकमेचा अवैध गुटखा साठा व गुटखा बनविण्यासाठी लागणारी मशीन व साहित्य हस्तगत करण्यात आले.
शिरवळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माननीय पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरवळ यशवंत नलावडे व शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि पोलिस अंमलदार तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्या मदतीने दिनांक ६ मार्च रोजी शिरवळ गावचे हद्दीतील स्टार सिटी अपार्टमेंटमधील गाळ्यांमध्ये छापा टाकला असता सदरच्या छाप्या दरम्यान पोलिसांना एकूण १ कोटी ६ लाख १९ हजार ३७९ रुपये किमतीचा मुद्देमाल यामध्ये गुटखा पान मसाला ८३ लाख १९ हजार २७० रुपये, गुटखा बनवण्याची मशीन व लागणारे सुपारी, पावडर पॅकिंग साहित्य आवश्यक मशीन १८ लाख ५० हजार रुपये,चार चाकी वाहन ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे सूचना दिल्या होत्या,त्याप्रमाणे शिरवळ पोलीस ठाण्याकडून पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी खास पथक तयार करून मागील काही दिवसांपासून या अवैद्य धद्यांवर कारवाया चालू केलेल्या आहेत.दरम्यान 6 मार्च रोजी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना मौजे शिरवळ गावच्या हद्दीत स्टार सिटी येथील बिल्डिंग मधील एका गाळ्यामध्ये बेकायदेशीर रित्या बाळकलेल्या प्रतिबंधित पदार्थ गुटखा घेऊन जाण्याकरता काही व्यक्ती वाहन घेऊन आले असल्याची खबऱ्यामार्फत बातमी मिळाली. सदरची प्राप्त बातमी पोलीस अधीक्षक सातारा यांना दिल्यावर त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून शिरवळ पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथक तयार करण्यास लावून सांगून संयुक्तपणे छापा टाकण्याच्या आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे आणि अन्नसुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर, इम्रान हवालदार,प्रियंका वाईकर यांच्या मदतीने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकत पंचनामा कारवाई करून १ कोटी ६ लाख १९हजार २७०रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये एकूण आठ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस निरीक्षक यांनी शिरवळ पोलीस ठाण्यातील कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे व व्यावसायिकांच्या त्रुटी शोधून त्यांच्याकडे खंडणी मागणी यासारखे प्रकार होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना कळवावी आपले नाव गुप्त ठेवण्यात येऊन संबंधितावर उचित कारवाई करण्यात येईल असे जनतेला आव्हान केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर,फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरवळ यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंद पोलीस अंमलदार शशिकांत भगत धरमसिंग पावरा,सुधाकर सूर्यवंशी तुषार कुंभार, सचिन वीर, सुरज चव्हाण, गोविंद बाराळी, भाऊसाहेब दिघे, दीपक पालेपवाड, तुषार अभंग, अजित बोराटे, सुधाकर सपकाळ, होमगार्ड संतोष इंगवले यांनी पार पाडली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा