आरोपीच्या वकीलाचा युक्तीवाद मान्य
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
सोलापूर येथे प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खुन केल्याप्रकरणी आरोपी पत्नीचा जामीन मे. एम. एस. शर्मा सो प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साो सोलापूर यानी मंजूर केला.
थोडक्यात हकीकत अशी की, अरुणा नारायणकर यांनी दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी त्याचे पती दाशरथ नारायणकर हे रात्री फोन वर होते. रात्री ३ वा. किचन मधुन आवाज आल्याने जाग आली. अरुणा ही किचन मध्ये गेली असता तिचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यावेळी अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचा व साडे पाच फुट उंचीचा इसम पाठीमागच्या दरवाज्यातुन बाहेर पळून गेला. अनोळखी इसमाने पतीचा खून केला म्हणून एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.चे कलम ३०२, १२०(ब), २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपासा दरम्यान अरुणा नारायणकर हिने तिच्या प्रियकराच्या सहाय्याने पतीचा खुन केला म्हणून अरुणा नारायणकर हिला तपास अधिकारी यांनी अटक केली. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण होऊन दोषरोप मे. न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर आरोपी नं २ अरुणा दशरथ नारायणकर यांनी वकिलामार्फत जामीन मिळणेकामी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. आरोपीच्या वकीलांनी युक्तीवाद केला परंतू सरकारी पक्षातर्फे जामीन अर्जास हरकत घेण्यात आली. आरोपीचे वकीलाचा युक्तीवाद मान्य करुन मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
सदर प्रकरणी आरोपी तर्फे ॲड. प्रकाश तु. अभंगे, ॲड. संदिप द. माने, ॲड. सागर कां. हंबीरराव, ॲड. रोहीत म. थेरात तर सरकार पक्ष तर्फे जिल्हा सरकारी वकील यांनी काम पाहिले
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा