श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या तुळशी पूजेसाठी होणार उपयोग
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस खेड (जि.पुणे) येथील पांडूरंग कड व भरत कड या भाविकांनी सुमारे 3 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे पुजारी तथा सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
सदरची देणगी पांडूरंग व भरत कड या बंधूंनी आपले पितार्थी कै. कृष्णाजी सोपानराव कड यांच्या स्मरणार्थ दिली असून, त्यामध्ये चांदीचे 4 नग ताम्हण, 4 पेले व 4 पळी इत्यादीचा समावेश असून, त्यांचे अंदाजे वजन 3 किलो होत आहे. कड बंधू हे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत व ते कुरूळी तालुका खेड (जि.पुणे) येथील रहिवाशी आहेत. या चांदी वस्तूचा श्रींच्या तुळशी पूजेसाठी उपयोग होणार असल्याचे यावेळी श्री श्रोत्री यांनी सांगितले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा