पुढील आदेश येई पर्यंत गट विकास अधिकारी म्हणून अंकुश म्हस्के हे काम करणार
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा येथील गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांची बदली झाल्याने देऊळगाव राजा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांच्याकडे प्रभारी गटविकास अधिकारी पदाचा पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्या आदेशाद्यारे सोपविण्यात आला होता. श्री.एम.एस. माहोर हे दि. ०३.०२.२०२५ पासुन अर्जित रजेवर गेले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांनी या वेळी पंचायत समिती चे कृषी अधिकारी म्हस्के यांच्याकडे दि. ५ फेब्रुवारी पासून अतिरिक्त गट विकास अधिकारी या पदाचा पदभार एका आदेशान्वये दिला असून. त्यांनी आजपासून पदभार स्वीकारला आहे.
पुढील आदेश येई पर्यंत गट विकास अधिकारी म्हणून अंकुश म्हस्के हे काम करणार असून ते पंचायत समिती सिंदखेड राजा येथे कृषी अधिकारी या पदावर रुजू असल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये यांची जवळीक निर्माण झाली असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास ते नेहमी कटिबध्द असतात. अशातच त्यांना प्रभारी का होईना गटविकास अधिकारी पदाचा पदभार मिळाल्याने नागरिकांमध्ये सुद्धा संतुष्टेची भावना निर्माण झाली आहे. प्रभारी गट विकास अधिकारी माहोर हे देऊळगाव राजा कधी सिंदखेड राजा, सुट्टी तर कधी फोन न उचलणे अशा अनेक कारणाने नागरिकांच्या समस्ये ची कारण बनत चालले होते. मात्र आता फोन उचलून लोकांच्या समस्या सोडवनारे कृषी अधिकारी म्हस्के हे गटविकास अधिकारी या पदावर असल्याने नक्कीच नागरिकांना आपल्या संबंधित कामा मध्ये त्यांचे सहकार्य लाभणार आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा