नवोप्रक्रम स्पर्धेत माध्यमिक गटात मिळवला प्रथम क्रमांक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील यशवंत शिक्षण संस्था सुरूरचे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे क्रीडा शिक्षक व पर्यावरण प्रेमी प्रकाश प्रल्हाद सोनवणे सरयांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्हा सातारा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामाफंत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोप्रक्रम स्पर्धा २०२४,२५ अंतर्गत माध्यमिक गयत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे उडतारे गावचे आदर्श व्यक्तिमत्व असणारे शिवाजी काशिनाथ बाबर उपाध्यक्ष श्री काळेश्व देवस्थान ट्रस्ट,माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी उडतारे माजी चेअरमन मकरंद पाटील पतसंस्था वाई यांच्या शुभहस्ते प्रकाश सोनवणे सर यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे श्री प्रवीण बाबर व्हा चेअरमन विकास सेवा सोसायटी उडतारे दादासाहेब बनसोडे सर मुख्याध्यापक बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे सर्व शिक्षक स्टाफ या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होता
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा