पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत लोकमान्य टिळक ग्रंथ संग्रहालय वाई संचिलत रमेश गरवारे सभागृह, वाई येथे 8 व 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा या कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव-२०२४ अंतर्गत ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवी संमेलन, लेखक व वाचक संवाद याबरोबरच ग्रंथोत्सवामध्ये विविध साहित्यिक कार्यक्रमांसोबतच शासकीय व बालभारती प्रकाशने, स्पर्धा परीक्षेचे ग्रंथस्टॉल आणि अन्य प्रकाशनांचे ग्रंथ प्रदर्शनासाठी व विक्रीकरिता उपलब्ध असणार आहेत. अशा या ग्रंथ, साहित्यिक व वाचक यांच्या आनंददायी व ज्ञानवर्धक मेळाव्यात जिल्हयातील सर्व ग्रंथप्रेमी व वाचकांनी सहभागी होऊन या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांनी केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा