maharashtra day, workers day, shivshahi news,

जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात अव्वल गुंतवणूक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार समाधान आवताडेंकडून अभिनंदन

पंढरपूर - मंगळवेढ्यासाठी उद्योग द्यावेत : आमदार समाधान आवताडेंकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी

cm devendra fadanvis, mla samadhan autade, pandharpur, midc, shivshahi news, solapur,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)

कुशल नेतृत्वाखाली दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने ऐतिहासिक गुंतवणूक प्राप्त केली आहे. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याने तब्बल 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यासाठी प्राप्त केली आहे ही ऐतिहासिक गुंतवणूक महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तुत्वाने देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जास्त गुंतवणूक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्याचे पत्र पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या वतीने देऊन काही उद्योग पंढरपूर व मंगळवेढा औद्योगिक वसाहतीमध्ये देण्यात यावेतं अशी मागणी करत मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक महाराष्ट्रासाठी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे .

त्यांनी दिलेले या पत्रात असे म्हटले आहे की माझ्या मतदारसंघात नुकतेच आपण पंढरपूर एमआयडीसी मंजूर करून दिली आहे सध्या त्या जागेची मोजणी चालू असून लवकरच ती जागा फिक्स होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असून आपण त्या ठिकाणी नवीन उद्योगासाठी कंपन्यांशी बोलून पंढरपूर साठी काही उद्योग पाठवले तर येथील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर मंगळवेढा एमआयडीसी बाबत ही मी नुकतीच बैठक घेऊन येथे जागा घेऊन उद्योग सुरू करण्यात व्यवसायिकांना नोटीसा काढून तात्काळ उद्योग सुरू करा 

अन्यथा त्यांच्या जागा काढून घ्या अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून मंगळवेढा येथील औद्योगिक वसाहतीमध्येही उद्योगधंद्यासाठी जागा उपलब्ध आहेत येथेही तात्काळ औद्योगीकरणाच्या दृष्टीने नवीन उद्योगांसाठी काही उद्योगपतींना आपल्या माध्यमातून प्रोत्साहित केले तर अनेक उद्योगधंदे येथे येऊ शकतात त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांना आपण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये भविष्यात आपल्या माध्यमातून मोठी परकीय गुंतवणूक करून मोठे उद्योग स्थापित करत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याल अशी अशा व्यक्त करतो अशा आशयाचे शुभेच्छा संदेश पत्र आमदार समाधान आवताडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून देऊन त्यांचे अभिनंदन केले

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !