वाई व्यापारी महासंघाची प्रचार सभा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाईच्या पर्यटन वाढीसाठी तब्बल १५० कोटींचा आराखडा तयार केला असून वाई शहरामध्ये संपूर्ण भारतातील पर्यटक यावेत,चित्रपट सृष्टी आकर्षित व्हावी म्हणून वाई शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही आ.मकरंद पाटील यांनी दिली आहे. वाई व्यापारी महासंघाच्या प्रचार सभेत आ.मकरंद पाटील बोलत होते.
या प्रसंगी सुमन काकी पाटील,अर्चनाताई पाटील,कांतीलाल जैन,चंदूलाल गांधी,भारतदादा खामकर,चरण गायकवाड,अनिल देव,सतीश शेंडे,नितीन कदम,सचिन फरांदे, दीपक ओसवाल, दीपक हजारे, विजय ढेकाणे इ.मान्यवर,वाईमधील सर्व व्यापारी,व्यावसायिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना आ.पाटील म्हणाले की कोविड ने तर खूप लोकांचं प्रचंड नुकसान केलंय.पण त्या काळात अहोरात्र काम करून मी माझे कर्तव्य पार पाडले.आपला व्यापार,व्यवसाय वाढण्यासाठी पर्यटन वाढलं पाहिजे.कृष्णा नदीवरील घाट नव्याने बांधतो आहे.वाई मध्ये सुंदर नवीन गार्डन होतंय.घटांच्या परिसरामध्ये भिंती बांधायच्या आहेत.कुठे ही मदत लागू द्या..मी आहे.वाई शहराच्या पर्यटन विकासासाठी १५० कोटींचा आराखडा तयार केला आहे.
वाई मधील पार्किंग साठी पाच कोटी मंजूर करून आणलेत. सर्वांना घेऊन वाई शहराचे नवीन व्हिजन बनवूया, लाडक्या बहिणीच्या हातात पैसे गेल्याने बाजाराला बूस्टर मिळाला.वाई शहरामध्ये व्यापारी,व्यावसायिकांची एवढी मोठी मीटिंग माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा होत आहे.ज्या विश्वासाने तुम्ही मीटिंग घेतलेली,मला पूर्ण पाठिंबा दिला त्याच विश्वासाने मकरंद पाटील भावी जीवनातील राजकीय वाटचाल कायम ठेवलं
ज्येष्ठ व्यापारी सतीशराव शेंडे म्हणाले की वाई चा अजून चांगला विकास करायचा आहे.वाई ही कलाकारांची भुमि आहे म्हणून वाई मध्ये नाट्यगृह झाल पाहिजे. भारत दादा खामकर म्हणाले की वाई हे शहर समृद्ध संस्कृतीचे शहर आहे.वाई हे पर्यटककांसाठी महत्त्वाचे शहर आहे.फिल्म शूटिंग साठी वाई आवडत शहर,टुरिस्ट वाढले,शूटिंग वाढले तर व्यावसायिकांना फायदा होईल.याचा आपण जाहीरनाम्यात उल्लेख केलाय त्याबद्दल आभार. युसुफ भाई बागवान म्हणाले की आबांनी कोरोना काळात उभारलेल्या हॉस्पिटल मुळे,आणि घेतलेल्या अथक परिश्रमामुळे आज आपण जिवंत आहोत.२८८ मतदार संघात रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते आबांचे काम करत आहेत.
विशाल मोरे म्हणाले वाई मध्ये ज्या दिवशी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात मोठ स्मारक होणार आहे.त्या दिवशी दिवाळी असेल..आपला उत्सव असेल.सगळे समाज एकत्र करण्याचं काम आबांनी केलंय. मनीषा ताई धैसास म्हणाल्या सर्व व्यावसायिक एकत्र आले म्हणजे मकरंद आबांचा विजय होणार हे नक्की. सोनू रवी ओसवाल म्हणाल्या की जानेवारी महिन्यात जैन महिन्यात लोकार्पण होणार आहे त्याचे आमंत्रण देते,मंत्री म्हणून ..तुम्ही आमचे लाडके बंधू आहात. विजय ढेकाणे - आजपर्यंतच्या इतिहासात वाई मधील संपूर्ण व्यापारी महासंघाने एखाद्या उमेदवाराला पाठींबा दिला नाही.ही पहिली वेळ आहे.इथे कुठल्या एक्झिट पोल ची गरज नाही.इथे बसलेला प्रत्तेक व्यापरी किमान १०० जणांना भेटत असतो..तोच खरा प्रचारक असतो.त्यालाच खरा मतदानाचा अंदाज असतो.विजयाची खात्री झालीच आहे.
चरण गायकवाड म्हणाले की मकरंद आबा म्हणजे आपल्या लाखो लोकांचा पोशिंदा आहे.शेतकऱ्यांसाठी ४६७ कोटी ज्या वेळी मिळणार होते त्यावेळी आबा दोन रात्र झोपले न्हवते.संध्याकाळी ७.३२ मिनिटांनी शेतकऱ्यांचे पैसे ट्रान्स्फर झाले त्यावेळी पहिल्यांदा मी आबांचा आनंदी चेहरा पाहिला. नितीन कदम सर म्हणाले ज्या ताकतीने आबा कामे करतात ती ताकत पाहता वाई शहराचा सर्वांगीण विकास फक्त आबाच करू शकतात.फक्त मकरंद आबांच्या मुळे कृष्णामाई घाटांच्या साठी ४० ते ७० कोटी रुपयांचे अंदाजे बजेट असणारे खूप मोठे काम आबांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून होतेय.आज पर्यंत कधीही एकत्र न आलेली,दिसलेली ही माणसं आज एकत्र आली आहेत.
सचिन फरांदे म्हणाले की वहिनींना बोलावलं कारण मी मागील चार टर्म आबांच्या विरोधात काम करणारा मी कार्यकर्ता आहे.२० वर्ष मी का झगडलो याच वाईट वाटतं.एक काळ असा होता इथून सर्वांकडे माल जायचा.इथल्या व्यापाऱ्यांचा धंदा कमी झाला आहे.हे कव्हर करण्यासाठी शूटिंग इथे आणावे.आणू शकला तर आमचा कस्टमर पुन्हा मिळेल. शैक्षणिक संस्था यांच्या पाठीशी उभे रहा.शैक्षणिक हब कडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहावे.२५ लाख लोक महाबळेश्वर ला प्रत्त्येक वर्षी जातात.इथे सुध्हा पर्यटकांनी यावे याची व्यवस्था करावी.व्यवसायासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी तुमची गरज आहे.
प्रास्ताविकपर भाषणात दीपक ओसवाल म्हणाले की या ठिकाणाहून सगळे संदेश तालुक्यात जात असतात.व्यापारी संघटनेच्या सर्व संस्था इथे एकत्र आहेत ते फक्त आबांच्या मुळे. गट तट,धर्म,पक्ष जात आबांनी कधीच पाहिले नाहीत.आबांनी विकासाची गंगा गावोगावी आणली आहे.कोरोना महामारी च्या भयानक अवस्थेवेळी आबांनी तिन्ही तालुक्यात तुम्ही उभ राहण्यासाठी ताकत दिली.मोठ्या भावाची भूमिका स्वीकारली.कुटुंब मानून विश्वास दिला.ताकत दिली.स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्याला वाचवलं.राजकारणात आबांच्या सारखी निती आणि नियत साफ लागते.म्हणूनच आ.मकरंद पाटील जैन समाजाच्या वतीने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे.सूत्रसंचालन नीलिमा सावंत यांनी केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा