डॉ.श्रीकांत पठारे यांच्यावतीने नवरात्रोत्सवात “जागर नारीशक्तीचा खेळ पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसंवाद गावभेट दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच नवरात्रोत्सवात महिलांसाठी विशेष म्हणून “जागर नारीशक्तीचा खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी करण्यात आलेले असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी व पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकविण्यासाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरच नवरात्रोत्सवामध्ये मतदारसंघातील सर्वच देवी-देवतांचा आशिर्वाद घेऊन विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभच करणार असल्याचेही डॉ.श्रीकांत पठारे पुढे म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये पारनेरच्या जागेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रबळ दावा केलेला असून तशी मागणी वेळोवेळी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडे केलेली आहे, त्याचदृष्टीने विधानसभा निवडणुक नजिकच्या काळात जाहीर होणार असल्याने शिवसेना प्रचारात कुठेही कमी पडू नये व मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवर पोहचण्यासाठी, पक्षाचे विचार व चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी हा दौरा आचारसंहिता लागेपर्यंत चालू राहणार असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगितले आहे.
यावेळी डॉ . शिरोळे , संतोष शिरोळे , प्रकाश रोहोकले , सखाराम उजगरे , किसनराव चौधरी , संतोष साबळे , डॉ पद्मजा पठारे , सरपंच कोमल भंडारी , सुनिता मुळे , संदीप मोढवे , अमोल गजरे , मंगेश सालके , किरण सुपेकर , अक्षय बेलोटे , डी . के . पांढरे , महेंद्र पांढरकर , मोहन पवार , संदीप भंडारी , अनिल पुंडे , सुभाष लोखंडे , मोहीत जाधव , प्रशांत निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ . श्रीकांत पठारे यांनी गेल्या काही वर्षांपासून विधानसभेसाठी पारनेर - नगर मतदार संघातून जोरदार तयारी सुरू केली असून मतदार संघातील प्रत्येक गाव , वाडी , वस्ती भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने पिंजून काढले असून आता नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून पुन्हा मतदार संघ ठवळून निघणार आहे . त्यामुळे तालुका प्रमुख डॉ . ठाकरे यांची उमेदवारी ची चर्चा प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणार आहे . त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी च्या सर्व नेत्यांची भेट घेवून या मतदार संघावर शिवसेनेचा हक्क सांगितला आहे .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा