maharashtra day, workers day, shivshahi news,

स्वाभिमानी जनतेचा परिवर्तनाचा आवाज म्हणजे परिवर्तन निर्धार यात्रा आता वाईमध्ये परिवर्तन अटळ - विराज शिंदे

प्रतापगड ते शिरवळ पर्यंत काढली ‘परिवर्तन निर्धार यात्रा

parivarta nirdhar yatra, viraj shinde, satara, wai, mahabaleshwar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करण्याचा निर्धार करीत काँग्रेसचे नेते विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगड ते शिरवळ पर्यंत ‘परिवर्तन निर्धार यात्रा’ आज पासून काढण्यात येत आहे, यात्रेची सुरुवात दिनांक 3 ऑक्टोंबर पासून होत असून शेवट 13 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. ही यात्रा खंडाळा-वाई-महाबळेश्वर या तिन्ही तालुक्यातील २०१ गावातून जाणार असून सुमारे ३ लाख मतदारापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आल्याचे विराज शिंदे यांनी सांगितले. ही यात्रा म्हणजे जनतेचा आवाज असून सर्वसामान्य नागरीकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सामील व्हावे असेही विराज शिंदे यांनी सांगितले आहे. 

“विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभाराचा भांडाफोड या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या शिवाय वाई-महाबळेश्वर-खंडाळा या मतदार संघाच्या विकासाचा नवा रोड मॅप जनतेसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही विराज शिंदे म्हणाले. शिंदे पुढे म्हणाले, की “मकरंद पाटील यांनी आपल्या कार्यकाळात महाबळेश्वर तालुक्याला क्वचितच भेट दिली आहे. हा भाग दुर्गम असल्यामुळे तेथे जाण्याची तसदी त्यांनी घेतली नाही, गेल्या १५ वर्षात आपल्या आमदाराचा चेहरा देखील लोकांना माहित असू नये हे निश्चितच खेदाची बाब आहे. तसेच हे आमदार म्हणून मकरंद पाटील यांचे घोर अपयश देखील आहे”, अशी टीका शिंदे यांनी केली. 

माझा माझ्या मतदार संघातील मतदारांवर ठाम विश्वास असून यावेळेला जनतेने परिवर्तनेचा निर्धार केला आहे असे स्पष्ट करून विराज शिंदे म्हणाले, “जनतेला वारंवार गूहीत धरून आपला स्वार्थ साधणारे लोक प्रतिनिधी आता आम्हाला नको आहेत. रोजगार ,विकास ,‌ वीज,पाणी,पायाभूत सुविधा शिक्षण,आरोग्य याला आमचे प्राधान्य आहे,म्हणून आता परिवर्तन आवश्यक असून यासाठीच परिवर्तन निर्धार यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा भव्य होणार असून परिवर्तनाची इच्छा असणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी व्यक्तींनी या यात्रेत सहभागी व्हावे,” असे आवाहन देखील शिंदे यांनी केले आहेत. दरम्यान या यात्रेमध्ये वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी होत असल्याचे दिसत आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी श्री. छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजा भवानी यांचे दर्शन घेऊन परिवर्तन निर्धार यात्रेचे शुभारंभ होणार आहे

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !