उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल साहित्यिक, मायबोलीचे उपासक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करत जल्लोष केला.
जगभरातील कोट्यावधी मराठी भाषिकांकरिता सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा 3 ऑक्टोबरचा दिवस आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी माणूस प्रयत्नशील होता त्या मागणीला आता यश मिळाले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अनेक मराठी साहित्यिकांनी व कलावंतांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या सत्काराचा त्यांनी नम्रपणे स्वीकार करत त्यांच्याशी संवाद साधला.
जेएनयू विद्यापीठात छ.शिवाजी महाराजांवर अध्यासन केंद्र सुरु करणार
माय मराठीचे सर्व उपासक, आणि महाराष्ट्रातील 12 कोटी तसेच जगभरातील कोट्यावधी मराठी भाषिकांकरिता हा दिवस सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. आपली मराठी भाषा, जी अभिजात भाषा होतीच, परंतु तिला अभिजात म्हणून राजमान्यता मिळणे गरजेचे होते. ती राजमान्यता काल मिळाली. यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे खूप खूप आभार मानतो. माय मराठीचे उपासक व वेगवेगळ्या समितींवर ज्यांनी काम केले, अनेक वेगवेगळे पुरावे ज्यांनी जमा करून दिले अशा सर्वांचे देखील हे श्रेय आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे, रिद्धपूर येथे पहिले मराठी भाषा विद्यापीठ व दुसरे अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे काम तर झाले. आता जेएनयू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अध्यासन केंद्र सुरु व्हावे, आणि मराठी भाषा ही केवळ संपर्क भाषा न राहता, ती आता ज्ञानभाषा कशी होईल या संदर्भात लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
याप्रसंगी भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये, लेखक विश्वास पाटील, संगीतकार कौशल ईनामदार, गायिका वैशाली सामंत, अभिनेत्री मधुरा वेलणकर व साहित्यिक दुर्गेश सोनार व मराठी कला साहित्य विश्वातील इतर मान्यवर उपस्थित होते.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा