maharashtra day, workers day, shivshahi news,

आ. समाधान आवताडेंच्या प्रयत्नांतुन 24 गाव उपसा सिंचन योजनेचे काम सुरू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज मंगळवेढयात अकराशे कोटींच्या  विविध विकास कामांचा शुभारंभ 

devendra fadavis, samadhann autade, midc, mangalwedha, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)

मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सुमारे ७०० कोटींच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ  आज दि 7 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव-दहिवडी रस्त्यावरील लक्ष्मीदेवी टेकावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उद्योग मंत्री उदय सामंत जलसंधारण मंत्री संजय राठोड सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

aaaa

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात कळीचा व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा ठरलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला  13 मार्च 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र या मंजुरीनंतर या अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे,हे केवळ राजकारणासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंजुरी देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशा टीका विरोधकांनी केल्या होत्या मात्र मंजुरीच्या दुसऱ्याच दिवशी टेंडर पब्लिश करत सरकारने विरोधकांना चपराक दिली होती त्यामुळे काही दिवसातच या योजनेचे काम सुरू होईल असा विश्वास दुष्काळी भागातील जनतेला वाटू लागला होता तो दिवस उजाडला असून प्रत्यक्षात या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे  .

aaaa

पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून समाधान आवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेढेकरांना दिला होता त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढेकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम ही केला आणि अवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत बुधवार १३ मार्च २०२४ च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६९७.५१ कोटीच्या  मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस विना अट मंजुरी देत मंगळवेढेकरांना दिलेला शब्द फडणवीस सरकारने पूर्ण केला होता त्यावेळी मंगळवेढा तालुक्यातून फटाके फोडून व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर विरोधकांकडून या अगोदरही अशी मंजुरी मिळाली होती यात नवीन काय? असं म्हणत या मंजुरीची खिल्ली उडवली जात होती मात्र पहिल्या टप्प्यातील 111 कोटीच्या कामाचा शुभारंभ होत असल्याने विरोधकांना टीका करण्यासाठी शब्द सुचेनासे झाल्याचे चित्र दिसत आहे .

aaaa

पहिल्या टप्प्यात  पंप हाऊस बांधकाम करणे,उर्ध्वगामी नलिका क्रमांक एकचे काम सुरू करणे, शेलेवाडी येथे वितरण कुंड तयार करणे,या कामाचा समावेश आहे त्यामुळे नुसत्या मंजुऱ्या देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा धंदा राजकारण्यांनी मांडला आहे असे म्हणणाऱ्यांना एक प्रकारे चपराक बसली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या टीमकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी खा.ओमराजे निंबाळकर,खा.धैर्यशील मोहिते पाटील,खा.प्रणिती शिंदे,आ.अरुण लाड.आ.सुभाष देशमुख,आ.राजेंद्र राऊत,आ.यशवंत माने,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,आ.विजयकुमार देशमुख,आ.संजय मामा शिंदे, आ. शहाजी बापू पाटील,माजी आ.प्रशांत परिचारक,आ जयंत आसगावकर,आ.बबनदादा शिंदे,आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.राम सातपुते हे उपस्थित राहणार आहेत.

aaaa

मंगळवेढा उपसा सिंचन योजना (७०० कोटी) पंढरपूर एमआयडीसी, तामदर्डी बंधारा (३५ कोटी), उपजिल्हा रुग्णालय मंगळवेढा(१०० कोटी) व कर्जाळ कात्राळ ते नॅशनल हायवे पर्यंतचा रस्ता (२०० कोटी) या विकास कामांचेही उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

devendra fadavis, samadhann autade, midc, mangalwedha, pandharpur, solapur, shivshahi news,








 

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !