लोटेवाडीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या हिराबाई सरगर यांची बिनविरोध निवड
शिवशाही वृत्तसेवा, सांगोला (तालुका प्रतिनिधी)
सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवार ५ सप्टेंबर रोजी सरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील गटाच्या हिराबाई बजरंग सरगर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर आमदार शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.
लोटेवाडी ता.सांगोला या ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर गुरुवार ५ सप्टेंबर रोजी निवडणुक घेण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रशांत जाधव तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक समाधान आदाटे यांनी सहकार्य केले. यावेळी सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्या हिराबाई सरगर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन सरपंच म्हणून हिराबाई बजरंग सरगर यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, माजी पंचायत समितीच्या सदस्या रूपाली लवटे, माजी सरपंच विजय खांडेकर, उपसरपंच शांताबाई चव्हाण, सदस्य नामदेव लवटे, नकुसा लवटे, दीपाली लवटे, सत्यवान देशमुख, सूत गिरणीचे संचालक सागर लवटे, पंडित देशमुख, प्रा. बाळासाहेब सरगर, बाळासाहेब लवटे, राजेंद्र हजारे, आप्पासाहेब सरगर, नानासाहेब ढेरे, सुभान लवटे, नवनाथ पाटील, विलास विभुते, बाळू विभुते, संजय लवटे, बिरुदेव सरगर, तानाजी मोटे, शहाजी देशमुख, दिलीप बाळाराम लवटे, प्रसाद लवटे, काकासाहेब देशमुख, श्रीरंग लवटे, बजरंग लवटे, विकास तोरणे, दगडू लवटे, रामभाऊ सरगर, शंकर जावीर, विलास काळेबाग, मेजर धनाजी शेंबडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. निवडी प्रसंगी पोलीस हवालदार असलम काझी व पोलीस कॉन्स्टेबल अतुल करांडे यांनी बंदोबस्त ठेवला होता. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कामाचा आढावा संपूर्ण गावाच्या समोर मांडण्यात आला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा