maharashtra day, workers day, shivshahi news,

पत्रकाराला उद्धट भाषेत बोलणारे ठाणेदार करवडे यांच्यावर कारवाई तातडीने करावी

सिंदखेडराजा पत्रकार संघाची जिल्हा पोलिस अधीक्षकाकडे मागणी

Action again policy inspector, journalist association, SindkhedRaja, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (तालुका प्रतिनिधि आरिफ शेख)

सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शांतता समितीच्या बैठकीमध्ये साखरखेर्डा ठाणेदारांनी पत्रकाराशी अरेरावी आणि उद्ठपणाची भाषा वापरून अपमानित केले 

मलकापूर पांगरा येथील लोकमतचे पत्रकार व गणेश उत्सव उत्सव मंडळाचे पाच वर्षे अध्यक्ष असलेले तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये मुस्लिम असून सुद्धा नेहमी सहभाग नोंदविणारे यांच्या बाबत केलेले चुकीचे वक्तव्य ठाणेदार करवडे यांच्यामुळे सामाजिक कीड निर्माण होण्याची वादग्रस्त वक्तव्यामुळे शांतता समिती बैठकीमधील या वर्तनामुळे शांतते ऐवजी सामाजिक अशांतता निर्माण होण्याची जास्त शक्यता दिसून येत असल्यामुळे ठाणेदार गजानन करवडडे यांची यासंदर्भात तात्काळ बदली करण्याची मागणी करून व चौकशी करून ठाणेदार करेवाड यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सिंदखेडराजा तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे 

या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की. 06 सप्टेंबर रोजी मलकापूर पांग्रा तालुका सिं.राजा येथे ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी साखरखेर्डा पो.स्टे.चे ठाणेदार गजानन करेवाड यांनी त्या ठिकाणी चर्चा करतांना  पत्रकार फकीरा पठाण यांना एकेरी संबोधून अत्यंत खालच्या पातळीवर अरेरावीची आणि उद्धटपणाची भाषा वापरून गावातील व्यक्तींसमोर अपमानीत केले. यासंदर्भात पत्रकारांनी त्यांच्याशी तुमचं हे बोलणं बरोबर नव्हतं असे सांगीतले असता त्यांनी आमचे म्हणणे न ऐकता, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या व मी तकारीला घाबरत नाही असे सांगितले. 

या ठाणेदारावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार दीपक नागरे भगवान साळवे वसीम शेख कासिम शेख सचिन खंडारे विठ्ठल देशमुख बाजीराव वाघ समीर कुरेशी वसीम शेख अमोल साळवे पवन मगर रमेश कोंडाणे गुलशेर शेख इसाक कुरेशी गजानन काळुसे फिरोज शेख भगवान नागरे अशोक इंगळे गणेश पंजरकर अफरोज शेख यांनी केली आहे

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !