विविध कला क्रीडा स्पर्धांचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवा अंतर्गत पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयांमध्ये "सहकारातून समृद्धीकडे" या उपक्रमा अंतर्गत पद्मश्रींचे जीवन कार्य आणि सामाजिक बांधिलकी यावर आधारित रांगोळी स्पर्धा सोबतच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जीवनपट आणि त्यांचे कार्य याविषयी प्रदर्शन आणि प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवा अंतर्गत हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिताताई विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे कॅम्पस संचालक डॉ. आर. ए .पवार, उप प्राचार्य डॉ. शांताराम चौधरी,प्रा. छाया गलांडे,डाॅ.अनिल वाबळे, क्रीडा संचालक डाॅ. प्रमोद विखे आदीसह प्राध्यापक ,स्पर्धक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा