जखमीवर जालन्याच्या कलावती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधि आरिफ शेख)
दुसरबीड जवळ असलेल्या टोल नाक्या स(मोर जुन्या मुंबई नागपूर महामार्गावर जालन्याकडून येणाऱ्या पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे दिनांक 11 सप्टेंबर रोजी रात्री 19. 30 वाजता चे सुमारास दुसर बीड गावाच्या हद्दीमध्ये टोलनाक्या जवळ अशोक लेल्यांड कंपनीचा एक ट्रक क्रमांक MH-46-BB-9595 क्रमांकाच्या चालकाने दुचाकी स्प्लेंडर प्लस क्रमांक MH- 28 BS-9792 वरील दोन इसम नामें 1. विष्णू लक्ष्मण इंगळे वय 46 वर्षे 2. दीपक मुकिंदा गवई वय 35 वर्ष दोघे राहणार ताडशिवनी तालुका सिंदखेड राजा यांना समोरुन ठोस मारून जखमी केले.
लगेच त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात सिंदखेड राजा येथे अंबुलन्स ने पाठवले मा वैद्यकीय अधिकारी सि राजा याना दोघांना तपासले त्यापैकी विष्णू इंगळे हा मरण पावले आहे असे सांगितले व दुसरा जखमी नामे दिपक गवई याचे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले वरून मृतक चा मुलगा समाधान विष्णू इंगळे यांचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन किनगाव येथे अप नं 199/2024 कलाम 106(1),281,125(a), 125(b), B.N.S.2023 सह कलम 134, 177, मो.वा. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरून मा ठाणेदार साहेब यांचे मार्गदर्शना खाली तपास ASI गणेश डोईफोडे व PC जाकेर चौधरी पोलीस स्टेशन किनगाव राजा हे करत आहे पुढील कायदेशीर कारवाही करण्याची तजवीज ठेवुन आहोत अशी माहिती सूत्रांनी दिली
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा