आगामी विधानसभा निवडणूक व संभाव्य उमेदवार यावर चर्चा
शिवशाही वृत्तसेवा, इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे)
दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 08 वाजता निमसाखर गावातील महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी आगामी विधानसभा निवडणूक व संभाव्य उमेदवार यावर चर्चा करण्यात आली. सदरील बैठक ही गावातील महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आली होती.
महाविकास आघाडीतून इंदापूर विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळण्याची शक्यता असून अनेक जण तिकिटासाठी इच्छुक आहेत. परंतु पक्ष आणि वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य करुन लोकसभा निवडणुकीप्रमाणे एकजुटीने दिलेल्या उमेदवाराचे काम करण्यास सर्वांनी अनुकूलता दाखवली.
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पुढेही बैठका घेण्यात येणार असून योग्यवेळी सर्वानुमते बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असे ठरवण्यात आले
या बैठकीला यशवंत विकास सोसायटीचे चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार रणवरे, ग्रामपंचायत सदस्य गोरख शेळके, श्रीकृष्ण विकास सोसायटीचे चेअरमन विकास रणसिंग, निमसाखर विकास सोसायटीचे संचालक जयंतराव मोरे, निमसाखर विकास सोसायटीचे संचालक नंदकुमार लक्ष्मण रणवरे, श्रीकृष्ण विकास सोसायटीचे संचालक प्रताप बापू कदम, शिवसेना माजी शाखाप्रमुख अरविंद अडसूळ, जेष्ठ नेते अण्णा पाटील, अजित उर्फ राजू पाटील, सत्यजित रणवरे, सागर रणवरे, रवि पवार, भैय्या क्षीरसागर, यश रणवरे, शिवाजी रिटे, बाळासो रणवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे आयोजन शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी केले होते.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा