स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांना वाहिली श्रध्दांजली
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे जाऊन स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले,आ.अमित देशमुख,आ.मोहन हंबर्डे,माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर,ईश्वरराव भोशीकर, दिलीपराव बेटमोगरेकर, प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी चव्हाण परिवारातील प्रमुख युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण व त्यांचे सर्व घरातील सदस्य उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा