maharashtra day, workers day, shivshahi news,

इंदापूर तालुक्यात आढळला दुर्मिळ 'रसल कुकरी' हा दुर्मीळ साप

निमसाखर परिसरात कुतुहलाचा विषय

Found in Indapur Taluka the snake , Indapur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे)

इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे सर्पमित्राच्या घरी  एक 'रसल कुकरी' हा दुर्मीळ साप आढळला. सर्पमित्र श्री अडसूळ सर यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अशा प्रकारचा साप प्रथमच आढळल्याने निमसाखर परिसरात तो कुतुहलाचा विषय झाला.

निमसाखर येथील वन्यजीव संरक्षण संस्था चे उपाध्यक्ष श्री अडसूळ सर  यांच्याकडे दुर्मीळ साप आढळला अडसूळ सर कामानिमित्त बाहेर गेले असता सकाळी घरी त्यांच्या मुलीला घरामध्ये साप येताना दिसला तिने लगेच वडिलांना फोन करून घरामध्ये साप आला आहे सांगितले.

कसा आहे 'रसल कुकरी' -रसेल कुकरी साप दुर्मीळ असून निमसाखर परिसरामध्ये प्रथमच आढळला आहे. हा साप बिनविषारी गटातील असून याची सरासरी लांबी १.६ इंच आहे. या सापाच्या मानेवर उलटा 'व्ही' अक्षराची खुण असते. या सापाचे पोट पांढरट किंवा फिकट पिवळसर असते. त्याचे शरीर सडपातळ व शेपुट आखुड असते. साधारण एप्रिल महिन्यादरम्यान या सापांचा प्रजनन काळ असतो. एक मादी ५ ते ९ अंडी घालते. लहान-लहान सरपटणारे प्राणी, किटक व त्यांची अंडी या सापाचे खाद्य असते. हा साप अंत्यंत शांत स्वभावाचा समजला जातो. मात्र, जर कधी हल्ला करायचा असेल तर, तो शरीर फुगवून हल्ला करतो, तसेच माझ्या वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये निमसाखर परिसरामध्ये प्रथमच हा साप पकडला अशी माहिती सर्पमित्र श्री अडसूळ सर यांनी दिली.

आपल्या परिसरात जखमी जंगली प्राणी साप तसेच जखमी पक्षी अढळल्यास वन्यजीव संरक्षक संस्था इंदापूर यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन श्री. अडसूळ यांनी केले आहे

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !