वृक्षलागवडीसाठी आता तरुणांच्या साथीला बालगोपालही
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पळवे खुर्द गावामध्ये यंदा खरिपाच्या सुरवातीला झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने तरुण मित्रांनी एकत्र येत वृक्षलागवड करण्याचा केलेला संकल्प आज पूर्ण केला. गावातील तरुणांनी एकत्र येऊन पळवे खुर्द गाव हे पूर्णपणे हरित करण्यासाठी जवळपास २५० चिंच,करंजी,भावा,आवळा तसेच ५५ वट वृक्षांची वेगवेगळ्या ठिकाणी लागवड करत देशी वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पाऊल उचलले आहे. गावा मध्येगावातील तरुणांनी एकत्र येऊन पळवे खुर्द गाव हे पूर्णपणे हरित करण्यासाठी पाऊल उचलले.
श्री नरेंद्र महाराज यांचे दर रविवारी सकाळी ऑनलाईन सत्संगचा कार्यक्रम होत असतो त्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी तरुणांना प्रेरित केले जाते. श्री स्वामी सेवक असलेल्या या तरुणांनी उपक्रम राबविण्यासाठी मेहनत घेतली त्यांचा सुरू असलेला हा उपक्रम पाहून बालगोपाल ही उत्साहात वृक्ष लागवडीसाठी तरुणांच्या बरोबरीने सहभागी झाल्याने तरुणही उत्साहित झाले. ह्यासाठी साईराज देशमुख, आदित्य देशमुख,सार्थक देशमुख,सिद्धार्थ देशमुख, प्रणव देशमुख, संस्कार देशमुख ह्या बालगोपालांसह नितीन देशमुख, गणेश देशमुख, पृथ्वीराज देशमुख,सिद्धार्थ देशमुख या तरुणांनी सहभाग घेतला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा