प्रवेश प्रक्रियेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवी विकास संस्था सारथी पुणे यांचे मार्फत विद्यार्थ्यांना मोफत कम्प्युटर डिप्लोमा कोर्स दिला जातो. या कोर्सच्या माध्यमातून स्पोकन इंग्लिश, आयटी, टॅली, ॲडव्हान्स एक्सल, तसेच इतर जॉब मिळवून देणारे कोर्स विद्यार्थ्यांना सारथी च्या मार्फत मोफत शिकवले जातात.
याही वर्षी विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येणार आहे असे श्री अशोक काकडे आय ए एम मॅनेजर डायरेक्टर सारथी यांनी सांगितले सरसेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा या योजनेअंतर्गत सारथी या योजनेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
यावेळी महाराष्ट्रातून सारथीचे सर्वात जास्त ऍडमिशन अहमदनगर जिल्ह्यातून झाल्याबद्दल अहमदनगर एलएलसीचे प्रमुख गणेशजी आठरे यांचा प्रथम पारितोषक देऊन सारथीचे चेअरमन श्री.अजित निंबाळकर यांनि सन्मान केला. या वेली श्री. विवेक सावंत Chief Mentor,Mkcl श्री. अशोक काकडे MD SARTHI श्रीमती विना कामत, MD MKCL, श्री नवनाथ पासलकर , माजी सचिव महाराष्ट्र राज्य, श्री. संजू जाधव, माजी सचिव महाराष्ट्र राज्य हे उपस्थीत होते.तसेच भाऊसाहेब आठरे, चक्रधर करे, संगीत थोरात, शशिकांत गलबले, परवेज शेख यांचा देखील सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवी विकास संस्था सारथी पुणे यांचे मार्फत विविध कोर्सेस मोफत शिकवले जातात अहमदनगर जिल्ह्यामधून 2023 या वर्षी 4000 हजार ऍडमिशन घेतले तरी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऍडमिशन घ्यावे व या संधीचा फायदा घ्यावा असे अवहान अहमदनगर जिल्ह्याचे MKCL LLC समन्वयक गणेश आठरे यांनी केले
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा