कवठे ग्रामस्थांनी केला तेजलचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी शुभम कोदे)
मनी वसे ते स्वप्नी दिसे.. अगदी असच काहीसं तिनं केलं, राखलं आणि सर्वांना जिंकलं आणि जिंकली ती भुईंजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवूनच.भोसले घराण्याला शोभेल अशी स्वच्छंदी वाटचाल जगत आणि तिथेच मनाशी एक ध्येय बाळगून तेजोमय स्वप्नातल्या गोष्टी सत्यात उतरवण्याची आस तिला लागली आणि ती आस आज तिला यशस्वी शिखरापर्यंत पोहचवू शकली.वेळ, काळ आणि स्वत:मधील कर्तबगारी सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे हे तिने समजून घेतले आणि स्वतःबरोबर आई, वडिलांचे नाव मोठे केलेच पण भुईंजचे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात चमकले. कु. तेजल उदयसिंह भोसले, रा. (भुईंज) चाहूर, ता.वाई, जि.सातारा असून किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि. भुईंज येथे कार्यरत असणारे डिस्टीलरी मॅनेजर उदयसिंह भोसले यांची कन्या असून तिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण भुईंज येथे झाले . अभियांत्रिकी शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षा मार्ग तिने निवडला.
या यशस्वी वाटचालीत आई वडील, पै पाहुणे आणि भोसले कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने हे घवघवीत यश तिला प्राप्त झाले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, तुमचं ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यांसमोर असेल तर कोणतेही यश हमखास मिळते हाच तरुणाईला तिने मोलाचा आरसा दाखवला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल कवठे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पोळ, शशिकांत करपे, पत्रकार विनोद पोळ तसेच कवठे ग्रामस्थ रवींद्र येवले, सुहास पोळ, कवठे येथील किसन वीर कारखाना कर्मचारी शिवाजी पोळ,राघवेंद्र डेरे, सतीश डेरे यांनी तेजलचे अभिनंदन करून तिच्या कार्यकाळात तिची उत्तरोतर प्रगती होऊन देशाचे, तालुक्याचे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करण्याबाबत तेजलला आशीर्वाद दिले.सत्काराला उत्तर देताना तेजलने आपण सर्वानी व्यक्त केलेल्या आशीर्वादरुपी सदिच्छा स्वीकारून आपल्या अपेक्षापूर्ती करण्याचा प्रयत्न निश्चितच माझ्याकडून घडेल असे यावेळी सांगितले. यावेळी आपल्या परिवारातील मुलीचा होत असलेला सत्कार पाहून कुटुंबियांचे डोळे पाणावले होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा