दुसरा, तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार - सामाजिक कार्यकर्ते नागनाथ माळगे
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
ग्रामीण भागातील गोरगरिबांना आपल्या हक्काचे पक्के घर असावे, यासाठी शासनाने पंतप्रधान आवास घरकुल योजना राबवली आहे. या बांधकामास शासनाचे १ लक्ष ४८ हजार रूपये मिळतात त्यातून आपले घर हे चांगले कसे बांधता येईल यासाठी लाभार्थी तळमळत आहे.
पण पंचायत समिती कार्यालय धर्माबाद येथे योजनेतील लाभार्थींना दुसरा हप्ता अजूनही मिळाला नाही तो कधी मिळेल असा प्रश्न नागनाथ माळगे यांनी उपस्थित केला. यावर अद्याप शासनाकडून निधी आला नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तेव्हा आवास योजनेतील दुसरा आणि तिसरा हप्ता तत्काळ खात्यात जमा होईल का ? गोरगरिबांना हक्काचे पक्के घर मिळेल का? यामध्ये मात्र शंका वाटत आहे.
कारण बांधकाम साहित्य गजाळी व रेतीचे भाव आज घडीला गगनाला भीडले यामुळे सर्व सामान्य माणसांना न परवडणारे आहे. यासाठी दुसरा,व तिसरा हप्ता तत्काळ खात्यात जमा करा. अशी मागणी माळगे यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा