पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश
शिवशाही वृतसेवा, जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा प्रतिक सोनपसारे
जलजीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागा अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी अल्पावधीतच करण्यात येणार असून यासाठी एक तज्ञ समिती नियुक्त करण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे .
मुंबई येथे वीस ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि मेहकर व लोणार तालुक्यातील योजनेच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला त्यावेळी हे आदेश त्यांनी दिले आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी यासंदर्भात बैठक घेण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कक्षात मुंबई येथे ही बैठक घेण्या मागणी केली होती त्या अनुषंगाने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कक्षात मुंबई येथे ही बैठक झाली त्यात बैठकीत आमदार डॉक्टर संजय रायमुलकर प्रधान सचिव संजय खंदारे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा अअभियंता अजय सिंग मुख्य अभियंता प्रशांत भामरे उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तांत्रिक तपासणी करणाऱ्या संबंधित कंपनीनेही कामाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे या कंपनीला काळे यादीत टाकण्यासोबतच मेहकर आणि लोणार तालुक्यातील सर्वच पाणीपुरवठा योजनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा