मुंबई येथे संघटनेची बैठक संपन्न
शिवशाही वृतसेवा, सातारा जिल्हा प्रतिनिधी , शुभम कोदे
महाराष्ट्र राज्य माथाडी व बांधकाम जनरल कामगार संघटनेची जिल्हा व तालुका कार्यकारिनीची नुकतीच एरोली, मुंबई येथे बैठकी जाहीर करण्यात आली. अपेक्स ग्लोबल एक्सपोर्ट व एडी प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स चे CEO व संस्थापक अथर्व अजय दिघे आंबेघर ता, जावली यांची महाराष्ट्र राज्य माथाडी व बांधकाम कामगार सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष कैलास गोरे व संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेश केदारी, सरचिटणीस श्रीयुत महाडिक, अ. नगर जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य किशोर गाडे यांच्या उपस्थित निवड करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात कामगाराच्या योजना पोहचवण्याचे काम करणार असल्याचे अथर्व दिघे यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. दिघे यांचे सामाजिक क्षेत्रात कार्य असून त्यांच्या निवडीचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी केंद्रप्रमुख रघुनाथ तुकाराम दिघे व आजी माजी सरपंच आंबेघर , पोलीस पाटील आणि ग्रामस्थ , तसेच वाई तालुका बार असोशियनचे सचिव ॲड. अक्षय संजय भाडळकर, दिघे परिवार यांनी अभिनंदन केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा