शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे (शिवस्मारक) सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी देशभक्तीगीत समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात सकाळी १० वाजता स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश नि:शुल्क आहे. शालेय स्तरावरील ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिरिष महाराज मोरे लिखित 'छ्त्रपती शिवाजी महाराज समजून घेताना' हे पुस्तक देण्यात येणार आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिक दिले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी नाव नोंदणी शनिवार दिनांक १० ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नवी पेठ येथील शिवस्मारक कार्यालयात करता येईल. नोंदणीसाठी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लिनाथ होटकर यांच्याशी ९८२२४९८३७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांनी या देशभक्तीगीत समूहगान स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवस्मारकतर्फे करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसने, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, संचालिका आणि स्पर्धा प्रमुख माधवी कुलकर्णी, संचालक प्रा. देवानंद चिलवंत, प्रसाद जीरांकलगीकर,
शिवस्मारकतर्फे वर्षभर चालतात विविध उपक्रम
शिवस्मारकतर्फे वर्षभर व्याख्यानमाला, किल्ले बांधणी स्पर्धा, आरोग्य शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, भजन स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा व्यायाम शाळा, शिवशिल्पप्रदर्शन आदी उपक्रम आयोजित करण्यात येतात. या उपक्रमांमध्ये शेकडो जण सहभागी होतात. यंदाच्या वर्षभरातही असे उपक्रम होणार असल्याचे शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सांगितले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा